परिचय
डॉ. प्रशांत पाटील यांचा जन्म टाकळी या जामनेर तालुक्यातील गावी झाला. 12वी पर्यंतचे शिक्षण जामनेर येथे घेतल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते 1998 साली कोल्हापूरला रवाना झाले. शिक्षणासाठी कोल्हापुरात असतांना 1999 साली मा. श्री. शरद पवार साहेबांच्या हस्ते RL Jwellers चे उदघाटन झाले. तेथे डॉक्टरांची शरद पवार साहेबांसोबत प्रत्यक्ष भेट झाली बराच वेळ हा साहेबांच्या सहवासात घालवल्याने डॉक्टरांना एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली. त्यानंतरचा कोल्हापुरातील संपूर्ण शैक्षणिक कालावधी हा काँग्रेसी विचारांच्या लोकांसोबत गेला. त्यामुळे डॉक्टर अगदी सहजपणे राजकारणाकडे वळले गेले. डॉ. प्रशांत पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सभासद असून जामनेर परिसरात ते एक संवदेनशील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात.
राजकीय भेटी-गाठी
लोकसभा निवडणुक प्रचार
निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव. एरवी वेगवेगळ्या सामाजिक कामासंदर्भात ज्यांची भेट होते तीच मंडळी या उत्सवात मतदार म्हणून भेटली. एक मतदार म्हणून त्यांना काय वाटते, त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते सांगत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार साहेब यांच्यावर प्रेम असणारी अनेक सामान्य माणसं, तरुण मंडळी यानिमित्ताने भेटली. सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड धनशक्ती असली तरी ही जनशक्ती मात्र सत्याच्या पाठीशी उभी आहे. गरज आहे ती योग्य नेतृत्वाची.
कृषी
जामनेर परिसरातील बहुतेक लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे, शेतीसंबधींत प्रश्नांचा परिणाम लगेच येथील जनजीवनावर पडतो. डॉ. प्रशांत पाटील हे डॉक्टर असले तरी शेतीशी निगडित प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे.कधी कधी पाणी टंचाई एवढी की शेतीलाच काय तर प्यायला पण पाणी मिळत नाही आणि कधी कधी अवेळी येणार पाऊस उभ्या पिकाचे नुकसान करुन जातो. यावेळी, जामनेरकरांच्या अडचणी सक्षम अधिकारी, पदाधिकारी यांच्यापुढे वेळेत मांडणे महत्वाचे ठरते. डॉ. प्रशांत पाटील यांनी अश्या पाणी टंचाई, कपात, अवकाळी पाऊस, सिंचन समस्येशी निगडित प्रश्न कार्यक्षमपणे हाताळले आहेत.
ठिबक सिंचन वरील दहा वर्षानंतर मिळणारे अनुदान दहा ऐवजी सात वर्षांवर आणण्यासाठी प्रयत्न
डॉक्टर सेलचा जामनेर तालुकाध्यक्ष असताना एक प्रश्न डॉ. प्रशांत पाटील यांच्याकडे आला होता – गव्हर्नमेंट ची ठिबक सिंचनासाठी मिळणारी सबसिडी ही फडणवीस सरकारच्या काळात १० वर्षांची होती. यात शेतकऱ्यांची अडचण अशी होती की, १० वर्ष ठिबकचा संच टिकत नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना जेव्हा पुन्हा ठिबक सिंचन करावे लागते त्यावेळेला सबसिडी चा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांना ठिबक सिंचन वरील १० वर्षानंतर मिळणारे अनुदान रद्द करून १० ऐवजी ते ७ वर्षांवर आणावे असा प्रस्ताव डॉ. प्रशांत पाटील यांनी मा. रोहित पवार यांच्यासमोर मांडला. २०१९ साली जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले त्यावेळी पहिल्याच अधिवेशनात तो प्रस्ताव मा. रोहित पवार यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडला गेला व त्याला मंजुरी देखील मिळाली. अशा पद्धतीने त्यांनी हे कार्य यशस्वी करून दाखवले. या कारणाने शेतकऱ्यांनी त्यांच्या या कामाचे प्रचंड कौतुक केले.
आरोग्य
स्वतः प्रशिक्षित डॉक्टर असल्याने डॉ. प्रशांत पाटील यांचे आरोग्याच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष असते. याप्रश्नाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समग्र असा आहे. म्हणून रुग्णांना माफक, मोफत उपचार मिळावा याप्रमाणेच ते लोकांनी आजारीच पडू नये म्हणूनही प्रयत्नशील असतात. यातूनच ते सतत रक्तदान शिबिर, मोफत कॅन्सर ऑपरेशन, वान आरोग्याचे, वॉक फॉर हेल्थ अश्या अनेक कार्यक्रमाचे सतत आयोजन करत असतात.
२५००हून अधिक रुग्णांना उपचारात विविध प्रकारे साहाय्य
जामनेर आणि परिसरातील अनेक गावे चिंचखेडा, वाकी, मोयखेडा अश्या अनेक गावांतील किमान २५०० रुग्णांना उपचार करण्यात डॉ. प्रशांत पाटील यांनी मदत केली आहे. यातील बरेच रुग्ण कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होते. काही रुग्णांना मणक्याचे, हृदयाचे असे गंभीर आजार होते. यातील काहींना माफक तर अनेकांना मोफत उपचार मिळतील किंवा अर्थसहाय्य मिळेल यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले.
युवा, महिला आणि रोजगार
युवकांमध्ये रोजगाराचा प्रश्न अत्यंत महत्वाचा हे लक्षात ठेऊन डॉ. प्रशांत पाटील तरुणांना सतत प्रोत्साहन देतात. ज्यांना विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, तसेच विविध परीक्षांमध्ये यशस्वी झालेला विद्यार्थ्यांना समाजापुढे आणून, त्यांचा सत्कार करतात. यातून परिसरातील इतर विद्यार्थ्यांना पण प्रोत्साहन मिळते.
तरुणांना शेतीवर आधारित व्यवसायावर मार्गदर्शन केले. अनेक तरुणांना या व्यवसायात उतरवण्यात सहकार्य केले. या सर्व नवउद्योजक शेतकरी तरुणांच्या सक्सेस स्टोरीज त्यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून सर्वांसमोर आणल्या व इतर तरुणांना उद्योजक होण्याकरिता प्रोत्साहन दिले.
उपोषण, आंदोलन, निषेध व मोर्चे
लोकशाही जिवंत राहावी म्हणून, लोकांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. डॉ. प्रशांत पाटील यांनी वेळोवेळी जनतेच्या असंतोषाला उपोषण, आंदोलन, निषेधाचा मार्गातून आवाज मिळवून दिला आहे. सत्ताधाऱ्यांकडून होणार महापुरुषांचा अवमान असो किंवा अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार डॉ. प्रशांत पाटील यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
इतर
आरोग्य, कृषी, रोजगार,युवा यांच्या प्रश्नांवर काम करत असतांना सोबतच संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणे, गाव पातळीवर जाऊन शासकीय योजनांची माहिती देणे, विद्यार्थी, तरुण यांना मार्गदर्शन करणे, संघटना बांधणी, पक्षाचा प्रचार, निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर तयारी असे अनेक इतर उपक्रमही डॉक्टर करतच असतात.
मीडिया
डॉ. प्रशांत पाटील यांची इलेक्ट्रॉनिक मीडियाने घेतलेली दखल इथे व्हीडिओजच्या रूपात उपलब्ध आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडिया
प्रिंट मीडिया
डॉ. प्रशांत पाटील यांनी केलेल्या कामांची, आंदोलनाची प्रिंट मीडियाने वेळोवेळी दखल घेतली आहे.यातील काही बातम्या आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत.
मदत
जामनेरवासीयांना शक्य त्या प्रत्येक मार्गाने मदत करण्याचा डॉ. प्रशांत पाटील यांचा प्रयत्न असतो यासाठीच स्वतः मदत करण्याशिवाय शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ जनतेला मिळावा यासाठीपण ते सतत प्रयत्न करतात. अश्याच, काही योजनांची माहिती खाली दिली आहे. यातील एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी केव्हाही संपर्क साधू शकता.