परिचय

जन्म – जून, 1981
जन्मस्थळ – टाकळी, जामनेर

शैक्षणिक पार्श्वभूमी

शालेय शिक्षण

न्यु इंग्लीश स्कुल, जामनेर.

इंदिराबाई ललवाणी हायस्कूल, जामनेर.

महाविद्यालयीन शिक्षण

जी. ई. एस. आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज गंगा एज्युकेशन सोस. कोल्हापूर. (BAMS) (2004)

छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल येथे 4 वर्ष practice

आंदोलन व मोर्चे

महागाई विरोधात आंदोलन

जनतेच्या मुलभूत प्रश्नाविषयी आवाज उठवत आंदोलने

CIA– NRC कायद्याविरुद्ध आंदोलन

भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध नोंदवत आंदोलन

जामनेर पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ उपोषण

महापुरुषांच्या अपमाना विरोधात मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज, सावित्री फुले यांसारख्या महापुरूषांचा अपमान केल्यामुळे गिरीश महाजन यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध

राजकारणाची सुरुवात

डॉक्टरांच्या घरातील परिस्थिती ही मध्यमवर्गीय होती. त्यामुळेच साधेपणा, शिक्षणाचे महत्व, कष्ट, एक विचार व समाजाप्रती आस्था, मदतीची भावना हे सारे गुण त्यांच्या अंगी लहानपणी पासूनच उपजत होते. डॉक्टरांचे कुटुंब हे आधीपासून मुळातच काँग्रेसी विचारांचे होते. त्यामुळेच या विचारांचा पगडा हा बालपणापासूनच त्यांचा मनावर खोलवर बसला होता. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापुरात गेले असता तेथे राष्ट्रवादीचे अनेक समाजसुधारक नेते त्यांचा संपर्कात येत गेले. जयंत पाटील साहेब, स्व. आर. आर. पाटील (आबा), सदाशिव मंडलिक, दिग्विजय खानविलकर असे अनेक प्रभावी नेतृत्व असलेल्या नेत्यांचा सहवास त्या वेळी अगदी जवळून डॉक्टरांना अनुभवायला मिळाला.

शिक्षणासाठी कोल्हापुरात असतांना 1999 साली मा. शरद पवार साहेबांच्या हस्ते RL Jwellers चे उदघाटन झाले. तेथे डॉक्टरांची शरद पवार साहेबांसोबत प्रत्यक्ष भेट झाली बराच वेळ हा साहेबांच्या सहवासात घालवल्याने डॉक्टरांना एक सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली. त्यानंतरचा कोल्हापुरातील संपूर्ण शैक्षणिक कालावधी हा काँग्रेसी विचारांच्या लोकांसोबत गेला. त्यामुळे डॉक्टर अगदी सहजपणे राष्ट्रवादीकडे वळले गेले.

राजकारणाकडे वळण्याअगोदरचं समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचा भावनेतून डॉक्टरांनी अनेक लोकपयोगी उपक्रम केले. आजही समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लोकपयोगी कामांच्या माध्यमातून ते अग्रेसर आहेत.

2008 साली जामनेरला परत आल्यानंतर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोक नोकरी, शिक्षणासाठी बाहेर जातात. कारण मुळात तिथे तितक्याशा संधीच उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेता परिवर्तन घडू शकते पण त्यासाठी तितक्याच ताकदीचे प्रयत्न करायला हवे ही जाणीव डॉक्टरांना झाली. त्यातच महापुरुषांच्या विचारांचा पगडा, सामाजिक संदर्भातील भरपूर वाचन यामुळे समाजसेवेची भावना ही तीव्र होत गेली. अनेक मित्र, सहकारी आणि आप्तेष्टांच्या माध्यमातून सृजन संवाद, अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, चळवळींचा ते भाग बनत गेले. त्यातूनच हळूहळू राजकारणाकडे त्याची वाटचाल सुरु झाली आणि डॉक्टर अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले.

1. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल जामनेर तालुकाध्यक्ष (2016 ते 2020)
डॉ. प्रशांत भिमराव पाटील यांची सक्रीय राजकारणाला 2016 साली सुरुवात झाली. त्यावेळी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जामनेर तालुकाध्यक्ष पद त्यांना बहाल करण्यात आले. आपल्या पेशाला पूर्णपणे न्याय देत त्यांनी या पदावर असतांना असंख्य लोकपयोगी कामे याअंतर्गत केली. कुठल्याही निधीची अपेक्षा न ठेवता अनेक कार्यक्रम हे त्यांनी स्वखर्चातून केले. जसे कि विविध आरोग्य शिबीर, रुग्णांना आर्थिक सहाय्यता मिळवून देण्यास मदत आणि या व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग, लोकांचे आरोग्याव्यातिरिक्त अनेक प्रश्न सोडविण्याचे कार्य त्यांनी केले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, एन्जिओग्राफी, बायपास यासंदर्भात देखील शिबिरे आजपर्यंत त्यांनी राबवली आहेत.

2. राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा युवक उपाध्यक्ष (2020 ते 2021)
2019 ला झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रचार- प्रसाराची धुरा डॉ. प्रशांत पाटील यांनी अगदी ताकदीने पेलली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. श्री संजय गरुड यांना पाठींबा देत वेगवेगळ्या माध्यमातून, कृतींमधून वेगवेगळ्या प्रकारे प्रचाराची रणनीती त्यांनी आखली. त्यानंतर त्यांचे हे पक्षासाठी, पक्षाच्या विचाराप्रती असलेले योगदान, कोल्हापूर- सांगली महापुरादाराम्यान बजावलेली आरोग्यसेवा व कोविड काळात केलेले कार्य बघून त्यांना 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा युवक उपाध्यक्ष हे पद बहाल करण्यात आले.

3. राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर तालुका युवकाध्यक्ष (2021 ते आजतागायत)
2021 मध्ये डॉ. प्रशांत भिमराव पाटील यांचे सर्व कार्य बघता त्यांना सर्व स्थानिक नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर तालुका युवकाध्यक्ष ह्या पदावर त्यांचा नावाचा शिक्कामोर्तब झाला. 2019 च्या निवडणुक पूर्व प्रचार- प्रसाराच्या वेळी मा. जयंत पाटील व इतर राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते त्यांचा संपर्कात आले. अनेकांकडून त्यावेळी काम करण्यासाठी प्रोत्साहन, मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्या व्यतिरिक्त रोहित पवारांसोबत देखील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी सन्मानीय शरद पवार साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आजतागायत काम करत आहे असे प्रांजळपणाने मत ते व्यक्त करतात.

सामाजिक कार्य
पेशाने डॉक्टर असलेल्या श्री. प्रशांत भिमराव पाटील हे आपल्या पेशापलीकडे जाऊन त्यांच्याकडे असलेल्या पदभारांचा कामकाज सांभाळत विविध माध्यमातून जनतेची अखंड सेवा करीत आहेत, जनतेचे सामाजिक, आर्थिक प्रश्न देखील ते सोडविण्याचा आतोनात प्रयत्न करत आहेत. राजकीय जीवनात काम करत असताना सामाजिक कार्याच्या माध्यमातून तालुक्यातील ज्या गोरगरीब रुग्णांसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद ई. ठिकाणच्या तज्ञ डॉक्टरांची मदत लागते त्यांच्यासोबत तितकेच मैत्रीपूर्ण संबंध ते जोपासतात. अखंड आणि अविरतपणे समाजाचा उन्नत्तीसाठी झटणारे ते एक खरे लढवय्ये नेते आहेत.